गीतरामायण हे एक जबरदस्त शब्द गारूड आहे आणि त्यात गुंतताना आयुष्याचे सोने होतं जाते. असे असूनही मी अजून संपूर्ण गीतरामायण ऐकलेले नाहीये. :(
काही निवडक गाणीच मी वारंवार ऐकत आलोय, त्यातच सुख मानत आलोय. पण काल एक मस्त चमत्कार घडला. 'वालीवध ना खलनिर्दालन' हे गाणे ऐकण्यात आले. गदिमांनी प्रभू श्रीरामांनी वालीला मारल्यानंतर त्याच्याशी केलेला संवाद शब्दसाजात गुंफला आहे.
त्यातील सुरुवातीचे कडवे :
"अखिल धरा ही भरतशासिता
न्यायनीति तो भरत जाणता
त्या भरताचा मी तर भ्राता
जैसा राजा तसे प्रजाजन"
मी तुमचा काही अपराध केला नसताना आडून, लपून तुम्ही मला मारलेत या गोष्टीत काय पुरुषार्थ आहे? असा प्रश्न जेव्हा वालीने प्रभू श्रीरामांना केला तेव्हा त्यावर दिलेले सुरेख उत्तर म्हणजे वरील कडवे.
वालीचा वध श्रीरामांनी केला ही गोष्ट न्याय्यच होती. पण त्याचे श्रेय श्रीराम कनिष्ठ बंधू भरतास देतात.
श्रीराम म्हणतात की हे अखिल साम्राज्य भरत अतिशय न्यायी आणि नीतिला धरून योग्य पद्धतीने चालवतो आहे. (थोडक्यात भरत एक योग्य आणि आदर्श राजा आहे.) आणि मी तर भरताचा सख्खा भाऊ तसेच त्याच्या नगरातील एक नागरिक असल्याने राजाच्या अंगातील सद्गुण प्रजेत आणि पर्यायाने माझ्यात देखील उतरले आहेत. त्यायोगे मी न्यायाची बाजू घेऊन तुला (वालीला) मारले आहे.
श्रीराम हे त्यांनी केलेल्या न्यायाचे श्रेय भरतास देतात. अभूतपूर्व बंधुप्रेम आणि त्रेता युगातील राजाच्या प्रती असणाऱ्या निष्ठेचे हे उदाहरण आहे.
'जैसा राजा तसे प्रजाजन' या एका ओळीत गदिमांची जादू आहे. तिथे reading between the lines करावे लागते आणि मतितार्थ मतीत उतरवावा लागतो.
अर्थात मला जे जाणवले हे मांडण्यासाठी हा सगळा घाट घातला. इथे प्रतिक्रया द्या, तुमचे मत वाचायला आवडेल.

आपला लेख उत्तम आहे.
उत्तर द्याहटवाReading between the lines हि एक कलाच आहे. तिचा पुरेपूर उपयोग वाचनात आलाच पाहिजे.
पु. ले. शु