बरेच दिवस झाले होते ब्लॉग बनवून. वाट पाहत होतो कधी वेळ मिळेल आणि काय पोस्ट करायचे तेही सुचत नव्हते. बाकी पुणेरी म्हणजे पुण्याचे लोकं (हा टोमणा नाही तरी क्षमस्व!) मस्तच ब्लॉग लिहितात. अगदी आवर्जून वाचण्याजोगे.
अजून ही काही नक्की नाही तरी काही प्रसिद्ध आणि मला आवडलेल्या कविता पोस्ट करणार आहे. (अशा वेळी कॉपी + पेस्ट हे सगळ्यात मोठे वरदान वाटते.)
तरी पुढील वेळी लंप्या विषयी लिहिण्याचा मानस आहे. ऑनलाईन वाचा-वाची करताना मनालीच्या आणि रश्मीच्या ब्लॉग वर लंप्याची ओळख झाली. वनवास विषयी कळालं. थोडा शोध घेतला तर लक्षात आलं की ही तर पुस्तकांची सीरिज आहे.
'वनवास', 'पंखा', 'झुंबर', 'शारदा संगीत'
मग काय Flipkart ला सांगितलं, पुस्तकं घरी आली. आईसाहेबांच्या भुवया वर झाल्या. आधी घेतलेली पुस्तकं तर वाच आणि मग नवीन घे वगैरे सल्ले दिले गेले, पण काय करु जुनी सवय (खोड) आहे संग्रह करण्याची. तर असो.
लंप्याचा 'बेष्ट' असा 'मॅड'नेस, त्याचे 'मॅड' मित्र आणि खऱ्या त्या २ गोष्टी ज्यांसाठी ही पुस्तके घेतली ती म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील लळा लावणारी कानडी वळणाची गोड मराठी आणि मलपृष्ठावरील पुलं चे मनोगत! हे सगळं म्हणजे अगदी परब्रम्ह प्राप्त झाल्यासारखं वाटतं आहे.
अजून ही काही नक्की नाही तरी काही प्रसिद्ध आणि मला आवडलेल्या कविता पोस्ट करणार आहे. (अशा वेळी कॉपी + पेस्ट हे सगळ्यात मोठे वरदान वाटते.)
तरी पुढील वेळी लंप्या विषयी लिहिण्याचा मानस आहे. ऑनलाईन वाचा-वाची करताना मनालीच्या आणि रश्मीच्या ब्लॉग वर लंप्याची ओळख झाली. वनवास विषयी कळालं. थोडा शोध घेतला तर लक्षात आलं की ही तर पुस्तकांची सीरिज आहे.
'वनवास', 'पंखा', 'झुंबर', 'शारदा संगीत'
लंप्याचा 'बेष्ट' असा 'मॅड'नेस, त्याचे 'मॅड' मित्र आणि खऱ्या त्या २ गोष्टी ज्यांसाठी ही पुस्तके घेतली ती म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील लळा लावणारी कानडी वळणाची गोड मराठी आणि मलपृष्ठावरील पुलं चे मनोगत! हे सगळं म्हणजे अगदी परब्रम्ह प्राप्त झाल्यासारखं वाटतं आहे.
“लंप्याच्या भाषेत सांगायच म्हणजे, ‘एकदा नाही, दोनदा नाही तर अठ्ठावीसशे तीस वेळा जरी ह्या कथा ‘ मॅड सारख्या वाचल्या’ तरी त्या ताज्याच वाटतील. एक निराळ्याच शैलीचा आणि वाचकाशी चट्कन संवाद साधून त्यालाही लंप्याच्या वयाचा करून टाकणारा कथासंग्रह मराठीत येतो आहे ह्या आनंदात मी आहे…..”- इति पुल.
असेच आनंद देत राहा अमर !
उत्तर द्याहटवा